कंगणा आता जयललिताच्या रोलमध्येही

बॉलिवूडमधील सध्याच्या पॉलिटिकल बायोपिकच्या ट्रेन्डमध्ये आता आणखीन एक भर पडणार आहे. मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे आणि पीएम मोदींच्या बायोपिकच्या पाठोपाठ आता तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावरील सिनेमाची तयारी सुरू झाली आहे. झांशीची राणी लक्ष्मीबाईचा रोल साकारणारी कंगणा रणावत हा रोल साकारणार आहे. स्वतः कंगणानेच ही बाब कन्फर्म केली आहे.

चित्रपट अभिनेत्रीपासून राज्याच्या मुख्यमंत्री बनण्यापर्यंतच्या जयललिता यांच्या कारकिर्दीवरील या सिनेमाचे “थलायवी’ हे तामिळमधील आणि हिंदीत “जया’ हे नाव असणार आहे. या दोन्ही भाषांमध्ये एकाचवेळी तयार होणाऱ्या या सिनेमाच्या डायरेक्‍शनची जबाबदारी विजय यांच्यावर असणार आहे. तर त्याची निर्मिती विष्णु इंदौरी करणार आहेत. “जयललिता या शतकातील सर्वात यशस्वी महिला होत्या. त्या सुपरस्टार होत्या आणि देशातील प्रमुख राजकीय नेत्याही होत्या. त्यांचा रोल साकारणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. मला ही संधी मिळणे माझे भाग्य आहे.’ असे कंगणा म्हणाली. दरम्यान जयललिता यांच्या जीवनावर आणखी एक सिनेमा येतो आहे. “द आयर्न लेडी’ नावाच्या सिनेमात नित्या मेनन ही जयललिता यांचा रोल करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)