आलिया भटने मागितली कंगनाची माफी

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतचा “मणिकर्णिका’ पाहायला न गेल्याने आलिया भटने तिची माफी मागितली आहे. गली बॉयच्या प्रमोशन कार्यक्रमात ती बोलत होती. ‘मणिकर्णिका’ पाहायला बोलावून सुद्धा कुणीही बॉलिवूड सेलिब्रेटी आले नाहीत म्हणून कंगना रनौत नाराज आहे.

कंगना रनौतचा राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित “मणिकर्णिका’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. आमीर खान आणि आलिया भट यांना बोलावून सुद्धा ते मणिकर्णिका सिनेमा पाहायला आले नाही, म्हणून कंगनाने खंत व्यक्त केली.
कंगनाच्या प्रतिक्रियेनंतर आलिया भटने कंगनाची माफी मागितली आहे. ती म्हणाली, मी “गली बॉय’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते.

कंगनाला दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. कंगनाला वाईट वाटलं असेल तर याबद्दल मी तिची माफी मागते, असे आलिया म्हणाली. शिवाय कंगना खूप बिंधास्तपणे आपले मत व्यक्त करते. हे बोलण्यासाठी धाडस लागते, असे देखील आलिया म्हणाली.

दरम्यान, “मणिकर्णिका’ चित्रपटात कंगनाने राणी लक्ष्मीबाईंची व्यक्तीरेखा साकारली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा तिनेच केले आहे. यात कंगनासह सुरेश ओबेरॉय, डॅनी, मराठमोळी अंकिता लोखंडे आदी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
106 :thumbsup:
103 :heart:
2 :joy:
104 :heart_eyes:
101 :blush:
4 :cry:
8 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)