शहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे

पुणे – सुट्टीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक, बेशिस्त वाहतूक आणि रस्त्याकडेला झालेल्या अतिक्रमणामुळे मध्यभागातील रस्ते जाम होत आहेत. शनिवारी मंडई चौकासह लक्ष्मी रोड, बाजीराव रोडवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. यात मंडईतील महापालिकेचे वाहनतळ अपुरे पडत असून वाहनांच्या रांगा लागत असल्याने कोंडीत भर पडत आहे.
शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या या रस्त्यांवर मोठ्या संख्येने कपड्यांची आणि सराफांची दुकाने आहेत. त्यामुळे हा भाग सातत्याने गजबजलेला असतो.

दिवाळीत या भागात गर्दी होते. पुणे शहर परिसरातून अनेक जण सहकुटुंब लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी येतात. पदपथाची रुंदी वाढविण्यात आल्याने लक्ष्मी रस्ता आणखी अरुंद झाला असून, रुंदी वाढवल्यानंतर या रस्त्यावर कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या मध्य भागात शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी खरेदीसाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस वाहतूक पोलिसांना येथील कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मंडई चौकात महापालिकेचे दोन वाहनतळ असून गर्दीच्या काळात ती अपुरे पडत आहेत. शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंडईतील गेनू बाबू वाहनतळ फुल्ल झाले होते. तरीदेखील अनेक चारचाकी वाहनचालकांनी याठिकाणी रांगा लावल्याने परिसरात कोंडी झाल्याचे दिसून आले. वाहनांची वाढती संख्या पाहाता वाहनतळ अपुरे पडत असल्याचे दिसून येते. परिणामी वाहनचालकांकडून जागा मिळेत तेथे वाहने लावली जात असून कोंडीत भर पडत असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)