कमला हॅरिसनी उभारला 24 तासात रु. 10 कोटीचा निधी

वॉशिंग्टन (अमेरिका) : सन 2020 च्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केलेल्या कमला हॅरिसनी 24 तासातच रु. 10 कोटीचा प्रचंड निधी उभारला आहे. भारतीय वंशाच्या पहिल्या सिनेटर असलेल्या कमला हॅरिस यांनी कालच आपली उमेदवारी जाहीर केली होती, मीडिया रिपोर्टनुसार केवळ 24 तासातच त्यांना सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी देणगीसवरूपात मिळाला आहे.

सुमारे 38,000 देणगीदारांनी कमला हॅरीस यांच्यावर देणग्यांचा पाऊस पाडल्याची माहिती फॉक्‍स न्यूजने दिली आहे. सरासरी प्रत्येक देणगीदाराने 37 डॉलर्स देणगी दिल्याचे सांगण्यात आले आहे. निधीबरोबरच कमला हॅरीस यांना सुमारे 1,10,000 डॉलर्सच्या देणग्या वस्तुरूपात मिळाल्या आहेत. यात प्रामुख्याने टोटे बॅग, कमला हॅरीस फॉर पीपल घोषणा असलेले टी शर्टस, हॅट आदीचा समावेश आहे. आपल्या देणगीबद्दल शतश: धन्यवाद, अशा शब्दात देणगीदारांचे आभार मानताना कमला हॅरीस यांने म्हटले आहे, की तुमच्यामुलेच इतका मोठा निधी जमा झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय माता आणि आफ्रिकन पित्याची संतान असलेल्या कमला हॅरीस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणाऱ्या डेमॉक्रेटिक पक्षाच्या चौथ्या उमेदवार आहेत. यापैकी ट्रम्प यांचा सामना करण्यासाठी डेमॉक्रेटिक पक्षाचा उमेदवार म्हणून कोणाची निवड होते हे जुलै 2020 मध्ये निश्‍चित होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)