कमलनाथ यांच्याकडून ममता, मायावतींनाही निमंत्रण

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून उद्या घेणार शपथ

भोपाळ: मध्यप्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ 17 डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबरच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपच्या प्रमुख मायावती यांनाही देण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येत्या सोमवारी फक्त कमलनाथ हे एकटेच शपथ घेतील. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तार होऊन इतर मंत्री शपथ घेतील. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छूक उमेदवारांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. तब्बल 15 वर्षांच्या खंडानंतर कॉंग्रेसला मध्यप्रदेशची सत्ता मिळाल्याने कमलनाथ यांचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्याचे पक्षाने ठरवले आहे. त्या सोहळ्याला मोठी गर्दी होण्याची चिन्हे आहेत. ती बाब ध्यानात घेऊन शपथविधी सोहळ्यासाठीचे येथील स्थळ बदलण्यात आले. त्या सोहळ्यात विरोधकांच्या ऐक्‍याचे दर्शन घडावे असा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे.

त्यातून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू, सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत बाजी मारून कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, स्पष्ट बहुमतापासून तो पक्ष थोडा दूर राहिला. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यातील 114 जागा कॉंग्रेसने पटकावल्या. अनुक्रमे 1 आणि 2 आमदार असणाऱ्या सप, बसपबरोबरच 4 अपक्षांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील नियोजित सरकारला पाठिंबा असणाऱ्या आमदारांचे एकूण संख्याबळ 121 इतके होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)