निवडणूक 2019 : कमल हसन काँग्रेससोबत हातमिळवणीस तयार,मात्र ठेवली एक अट

नवी दिल्ली – अभिनय क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात प्रवेश केलेल्या कमल हसन याने तामिळनाडूमध्ये काँग्रेस बरोबर येण्यास समंती दर्शवली आहे. मात्र त्याने यासाठी एक महत्वाची अट ठेवली आहे. कमल हसन याने म्हटलं आहे की, त्याचा मक्कल निधि मय्यम (एमएनएम) पक्ष आगामी 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी युती करण्यास तयार आहे, पण यासाठी काँग्रेस पक्षाला द्रमुक (डीएमके) यांच्याशी असलेली युती तोडावी लागेल.

दरम्यान कमल हसन याने फेब्रुवारीमध्ये मक्कल निधि मय्यम हा पक्ष स्थापन केला. आणि त्यानंतर तो सतत तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार याच्यांवर टीका करत आहे.

-Ads-

एका स्थानीय चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कमल हसन म्हणाला की, डीएमके आणि काँग्रेस याच्यांतील युती तुटणार असेल तर आमचा पक्ष आगामी 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची हातमिळवणी करेल. तसेच त्याने काँग्रेसला एक वचनसुध्दा मागितले आहे की, एमएनएम आणि काँग्रेस यांंचे एकत्रित सरकार तामिळनाडूतील नागरिकांचे नेहमीच फायद्याचे काम करेल.

कमल हसन म्हणाला की, एमएनएम पक्षाचा उद्देश भ्रष्टाचाराविरुध्द लढणे आहे. आमचा पक्ष केव्हाही भ्रष्ट पक्षाची हातमिळवणी करणार नाही. त्याने म्हटलं आहे की, द्रमुक आणि एआयएडीएमके दोन्ही पक्ष भ्रष्टचारी आहे. तामिळनाडूमधून या दोन्ही पक्षांना हटविण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेणार आहोत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)