‘जर आम्ही एकत्र आलो तर…’

कमल हसन यांचे रजनीकांतसोबतच्या आघाडीवर भाष्य

चेन्नई –  दक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला असला तरी दोघेही युती करणार का ? असा प्रश्न सुरुवातीपासूनच उपस्थित केला जात आहे. कमल हसन यांनी ‘मक्कल निधी मय्यम पक्षा’च्या स्थापनेपूर्वी रजनीकांत यांची सदिच्छा भेट घेतली होती. यानंतर दोघेही युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु त्यांनी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, जर कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र निवडणूक लढवली तर त्यांना कोणीही पराभूत करू शकणार नाही, हेही तितकेच खरे. यावर आज कमल हसन यांनी भाष्य केले आहे.

-Ads-

कमल हसन म्हणाले कि, हे काल्पनिक असले तरी आम्ही दोघे एकत्र आल्यास हे होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. ते पुढे म्हणाले, परंतु, हे होऊ शकत नाही. एवढेच नाही तर आम्ही दोघांनीही एकत्र एकाच चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण दोघांचीही चित्रपटाची फि जास्त असून ते निर्मात्याला परवडण्याजोगे नाही, असे सांगून ते म्हणाले, राजकारणासाठीही अशीच कारणे असू शकतात. आम्हालाही माहित नाही, असे त्यांनी सांगितले. कमल हसन यांनी अद्याप कोणत्याही राजकीय आघाडीचे संकेत दिलेले नाही.

दरम्यान,  तामिळनाडूच्या राजकारणात कायमच सिनेकलाकारांचा दबदबा राहिला आहे. सुरुवातीला एमजीआर आणि त्यानंतर जयललिता यांची उदाहरणे आहेत. त्यानंतर आता रजनीकांत आणि कमल हसन यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला आहे.  या दोघांमध्ये युती होणार का? याचे उत्तर आगामी काळच सांगू शकेल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)