पंतप्रधानाच्या शपथविधी सोहळ्यासाठी कमल हासन यांना निमंत्रण

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेता आणि ‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

https://twitter.com/ANI/status/1132942918581284864

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी येत्या गुरुवारी (30 मे) रोजी होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात होणाऱ्या समारंभामध्ये मोदी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत सलग दुसऱ्या वेळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील, असे राष्ट्रपती भवनाच्या सचिवालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांनी ‘मक्कल निधी मय्यम’ या पक्षाची स्थापना करत तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला. लोकसभा निवडणकीसोबतच त्यांच्या पक्षाने तमिळनाडूतील विधानसभेच्या २० रिक्त जागांसाठी देखील निवडणूक लढवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)