मदुराई: कमल हासन यांनी देशातील पहिला दहशतवादी हिंदू होता, असे वक्तव्य केले होते. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदाहरण दिले होते. या वक्तव्यनानंतर मोठे वादंग निर्मांण झाले होते.
दरम्यान, कमल हासन यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पिठाचे न्यायाधीश आर. पुगालेंधी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर करताना सध्या द्वेषमूलक भाषण करणे हे नियमित बाब बनली असल्याची टीका केली.