पिंपरी – येत्या बुधवार (दि. 8) आणि गुरूवार (दि. 9) रोजी पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज यांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी पहाटे पाच ते सात या वेळेत श्री काळभैरवनाथ महाराजांना अभिषेक व महापूजा होईल. रात्री नऊ वाजता श्री काळभैरवनाथ महाराज यांच्या पालखीची व छबिना मिरवणूक निघणार आहे.
गुरुवार दि.9 रोजी दुपारी साडेतीन वाजता नव महाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर काळभैरवनाथ चषक व निकाली कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. कुस्त्यांसाठी सहा लाख रुपये व चांदीची गदा याप्रमाणे बक्षीसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.