बॉक्‍स ऑफिसवर “कलंक’ फ्लॉप

“कलंक’ तब्बल 4 हजार स्क्रीनवर रिलीज झाला होता. “कलंक’मध्ये आलिया, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, माधुरी दीक्षित यासारखे बडे कलाकार असतानाही सिनेमाला अपयश येणे दुर्दैवी आहे. ओपनिंगलाच केवळ 21 कोटींचा धंदा केलेल्या “कलंक’ने गेल्या आठवड्यापासून केवळ 66 कोटी रुपयांचा धंदा केला.

“कलंक’ची ही कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. विश्‍लेषकांनी सिनेमाचे संमिश्र कौतुक केले असले तरी बॉक्‍स ऑफिसवरचा रिझल्टच सिनेमाचे भविष्य ठरवत असतो. वितरक, निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार सर्वांनाच या खराब परफॉर्मन्समुळे वाईट वाटणे स्वाभाविक आहे. आतापर्यंत कोणीही या फ्लॉप सिनेमाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आलिया भटने सर्वप्रथम “कलंक’च्या खराब परफॉर्मन्सबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. हा सिनेमा हिट ठरवायचा की फ्लॉप याचा निर्णय प्रेक्षकांच्या हातात होता. प्रेक्षकांच्या न्यायालयामध्ये “फ्लॉप’ असा निर्णय झाला आहे. त्यामुळे हा निर्णय स्वीकरायला पाहिजे, असे आलिया म्हणाली.

मी स्वतः कधीच स्वतःच्या सिनेमाचे विश्‍लेषण करत नाही. जर प्रेक्षकांना सिनेमा आवडला नाही, तर हा सिनेमा नक्कीच चांगला नव्हता, हे उघड आहे. ही गोष्ट आपण स्वीकारूया आणि पुढच्यावेळी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, असेही आलिया म्हणाली. आलियासाठी हिट सिनेमांच्या मालिकेतला हा एक अपवाद ठरला एवढेच.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)