विनयभंगाच्या 12 वर्षे जुन्या प्रकरणाने कैलास खेर अडचणीत 

नाना पाटेकरवर तनुश्री दत्ताने 10 वर्षांपूर्वी विनयभंग केल्याचा आरोप केल्याचे प्रकरण अजूनही ताजे आहे. रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता गायक कैलास खेरच्या एका प्रकरणाचीही भर पडली आहे. एका पत्रकार महिलेने कैलास खेरविरुद्ध विनयभंगाचा आरोप केला आहे. सुमारे 12 वर्षांपूर्वी कैलास खेरने आपल्याला अपमानास्पदरितीने स्पर्श केल्याचा आरोप या फोटोग्राफर पत्रकार महिलेने केला आहे. अशाच एका दुसऱ्या घटनेमध्ये मॉडेल आणि ऍक्‍टर झुल्फी सैईदवरही असाच आरोप या महिलेने केला आहे. तिने ट्‌विटरच्या माध्यमातून हा आरोप केला आहे.
12 वर्षांपूर्वी इंटरव्ह्यू घेण्याच्या निमित्ताने ती कैलास खेरला भेटली होती. त्यावेळी कैलासने या महिलेस आणि तिच्या सहकारी महिलेस विनाकारण स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब या महिलेने आपल्या सहकाऱ्यांना सांगितली तेंव्हा स्वतःच स्वतःची काळजी घ्या, असा फुकटचा सल्ला तिला दिला गेला होता. झुल्फी सईदने एका इव्हेंटच्यावेळी आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी सईदने माफीही मागितली होती, असेही या पत्रकार महिलेने आपल्या ट्‌विटर पोस्टमध्ये म्हटले आहे. आता या मुद्दयावरून नवीन वादळ निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)