औरंगाबाद जिल्हा परिषदेतील सेना-कॉंग्रेस युतीचा काडीमोड 

औरंगाबाद – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघत असून औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली कॉंग्रेससोबतची युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. हा निर्णय शिवसेना-भाजपाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही बैठक महापौर बंगल्यावर आज पार पडली.

राज्यात भाजप-शिवसेनेची युती असल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, शिवसेनेने जिल्हा परिषदमध्ये असलेले कॉंग्रेसची युती तोडावी. तेव्हाच आम्ही प्रचार करु. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या समन्वयाची एक बैठक महापौर बंगल्यावर बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी ही युती तोडल्याची घोषणा केली.
सध्या जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष, तर कॉंग्रेसचा उपाध्यक्ष आहे. अडीच वर्षानंतरच्या निवडणुकीला तीन महिने राहिले आहेत. या तीन महिन्यानंतरच्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष असेल अशी घोषणा चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेनेने औरंगाबादमध्ये कॉंग्रेससोबत असलेली युतीचा काडीमोड करण्याचा निर्णय घेतला. मात्र तशीच युती जालन्यात देखील आहे. त्यामुळे जालन्यातील कॉंग्रेससोबतची युतीही शिवसेना तोडणार का? याशिवाय भाजपाने देखील अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. ती देखील तोडणार का? हे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)