सिद्धार्थ मल्होत्राला डेट करतेय कियारा आडवाणी?

बॉलीवूडमध्ये काही दिवसांपासून अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे नवीन कपल प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यातच आता दोघोना एकत्रित सीक्रेट डेटवर स्पॉट करण्यात आले आहे. हे दोघेजण एका मॉलमध्ये एकत्रित मूव्ही पाहताना दिसून आले होते. मात्र, दोघांनी रिलेशनशिपमध्ये नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच मी सिद्धार्थला डेट करत नसल्याचे कियाराने सांगितले.

फिल्मफेअर अवॉर्डसच्या रेड कार्पेटवर कियाराला डेटबाबत विचारण्यात आले होते. तेव्हा तिने डेटिंगबाबत अफवा असल्याचे सांगत असा प्रतिसवाल केला की माझ्यासाठी कोणी चांगली व्यक्‍ती आहे का?

दुसरीकडे सिद्धार्थनेही करण जोहरचा चॅट शो “कॉफी विद करण’मध्ये सांगितले होते की, मी कियाराला डेट करत नाही. ज्या प्रकारे या अफवा पसरविल्या जात आहे, त्या ख-या ठराव्यात, असे मला वाटते. पण मी सध्या सिंगलच आहे. सिद्धार्थ म्हणाला, कियाराचा स्वभाव खूपच चांगला असून भविष्यात नक्‍कीच आम्ही दोघे एकत्रित काम करू.
दरम्यान, कियारा आगामी “गुड न्यूज’ चित्रपटात अक्षय कुमार, करीना कपूर-खान, दिलजीत दोसांझसोबत झळकणार आहे. तर सिद्धार्थ “शॉटगन शादी’तून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here