प्रसिद्ध अभिनेते ‘कादर खान’ यांच्या निधनाची अफवा

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कादर खान यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अतिशय गंभीर आहे. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी याकरिता सोशल मीडियावरून अनेक चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे काहीजण सोशल मीडियावरून कादर खान यांच्‍या निधनाची अफवा पसरवत आहेत.

निधनाबदलच्या अफवेची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि चाहते त्‍यांना श्रद्धांजली अर्पण करु लागले. पण यासर्व प्रकारानंतर कादर खान यांचा सरफराज खान याने प्रसारमाध्यमाव्दारे ही केवळ अफवा असल्याचे सांगत याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून कादर खान यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. मात्र त्यानंतर कादर खान यांच्या निधनाची बातमी चुकीची आणि अफवा असल्याचे मुलगा सरफराज खान यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)