कॅप्टनकुल अनुपकुमार कबड्डीतून निवृत्त

पंचकुला, दि. 20 – प्रो-कबड्डी लीग मध्ये आपल्या घरच्या सामन्याच्यावेळी अनुप कुमारने आपली निवृत्ती जाहीर करत साऱ्यांनाच धक्का दिला आहे. अनुपने भारतीय कबड्डी संघाचे कर्णधारपद भूषवले होते. त्याचबरोबर प्रो-कबड्डीमध्ये अनुपने सुरुवातीला यु मुंबा संघाचे कर्णधारपद भूषवले होते. सध्या अनुप कुमार हा जयपूर पिंक पॅंथर्स संघाचा कर्णधार होता. 2018च्या मोसमात अनुपला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जयपूरसोबतच्या अखेरच्या सामन्यानंतर त्याला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेत मैदानाला प्रदक्षिणा घातली.

2006मध्ये अनुपने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा प्रारंभ केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व अनुपने केले होते तसेच 2014च्या आशियाई स्पर्धेतही तो खेळला होता. 2016मध्ये कबड्डी वर्ल्डकपही त्याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता. प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात यू मुम्बाचे नेतृत्व करत या संघालाही विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा वाटा होता. 2012 मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदाच्या मोसमात त्याने 13 सामन्यांत 50 गुणांची कमाई केली. त्याच्या नेतृत्वाखाली जयपूरला 14 पैकी 4 सामने जिंकता आले. अनुपने प्रो कबड्डी लीगमध्ये 91 सामन्यांत 596 गुणांची कमाई केली आहे. सर्वाधिक गुण कमावणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सहाव्या स्थानी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)