चेतक स्पोर्टस, उत्कर्ष क्रीडा संस्था उपान्त्य फेरीत दाखल

चेतक स्पोर्टस्‌च्या स्वप्नील बाववडकरने साई स्पोर्टस्‌च्या लक्ष्मीकांत जमादारची केलेली पकड.

पुणे – पुरूष विभागात चेतक स्पोर्टस्‌, उत्कर्ष क्रीडा संस्था, युवक क्रीडा मंडळ व महाराष्ट्र कबड्डी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या भोसरी येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर कै. प्रमोद कुलकर्णी क्रीडानगरीत आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ कबड्डी संघ आयोजित ‘आमदार चषक ‘ मॅटवरील कबड्डी स्पर्धेचा उपान्त्य फेरीत प्रवेश केला. तर महिला विभागात राजामाता जिजाऊ, जागृती प्रतिष्ठान, शिव ओम कबड्डी संघ व ओम साई वडगाव शेरी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत उपान्त्यफेरी गाठली.

उत्कृष्ट पुरूष विभागात झालेल्या उपान्त्यपुर्व सामन्यात महाराष्ट्र कबड्डी संघाने महाराणा पुणे संघावर 34-11 असा दणदणीत विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मद्यंतराला महाराष्ट्र कबड्डी संघाकडे 22-5 अशी आघाडी होती. महाराष्ट्र संघाच्या चेतन थोरात व दिपक गिरी यांनी जोरदार खेळ करीत आपल्या संघाला मध्यंतराला पुर्वीच भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यांना अक्षय नखाते यांनेही उत्कृष्ट पकडी घेत चांगली साथ दिली.

महारामा संघाच्या संकेत अनपट याने एकाकी लढत दिली. पुरूषांच्या दुसऱ्या सामन्यात बालेवाडीच्या चेतक स्पोर्टस्‌ संघाने महाराणा मंचर संघावर 27-11 अशी मात करीत उपात्यं फेरीत प्रवेश केला. चेतक संघाच्या स्वप्नील बालवडकर व महेश बालवडकर यांनी चांगल्या चढाया करीत आपल्या संघाला विजयाकडे नेले. तर संकेत बालवडकरने चांगल्या पकडी घेतल्या. महाराणा मंचर संघाच्या प्रथमेश निघोट व मेघनाथ निघोट यांनी चांगली लढत दिली.

महिला विभागात ओम साई वडगाव शेरी संघाने पुण्याच्या राजा शिवछत्रपती संघावर 39- 36 अशा निसटता विजय मिळवित उपात्य फेरीत प्रवेश केला. मद्यंतराला ओम साई वडगाव शेरी संघाकडे 26-16 अशी आघाडी होती. ओम साई संघाच्या आफरिन शेख व आम्रपाली गलांडे यांनी उक्तृष्ट खेल केला. त्यांना अंकिता चव्हाण हिच्या पकडींचा हातभार लागला. राजा शिवछत्रपती संघाच्या मानसी रोडे व सिध्दी मराठे यांनी चांगला खेळ करीत सामन्यात चांगलीच रंगत भरली होती. त्यांना सिध्दी पोळचीही चांगली साथ लाभली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.

महिलांच्या दुसऱ्या सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने महेशदादा स्पोर्टस्‌ फौडेशन संघावर 42-30 अशा विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मद्यंतराला राजामाता जिजाऊ संघाकडे 27-10 अशी निर्णायक आघाडी होती. राजमाताच्या अनुभवी स्नेहल शिंदे, सायली केरीपाळे व अंकिता जगताप यांच्या खेळापुढे महेशदादा स्पोर्टस्‌ फौडेशनच्या संघाचा बचाव चांगलाच भेदला होता. महेशदादा स्पोर्टस्‌ फौंडेशनच्या राधा मोरे व पूजा शेलार यांनी चांगली लढत दिली तर दिपाली काजळे हिने काही पकडी घेतल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)