कबड्डीपटू अनूप कुमारची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली – भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार अनूप कुमारने कबड्डीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 2006 मध्ये साउथ आशियाई स्पर्धेत श्रीलंकेच्या विरूध्द अनूप कुमारने आपली कारकिर्द सुरू केली होती. तो 2010 आणि 2014 आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकलेल्या भारतीय संघाचा सदस्य देखील होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2016 मध्ये अनूप कुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वकचषक जिंकला होता. प्रो कबड्डी लीगमध्ये दुसऱ्या सत्रात यू मूंबाने अनुपच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले होते. तसेच अनूप कुमार प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)