# Me Too:  बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिचे देखील आरोप

भारताची बॅडमिंटन दुहेरीचे खेळाडू  ज्वाला गुट्टा हिने देखील #Me Too चळवळीत आपला सहभाग नोंदवला आहे. यात तिने राष्ट्रीय बॅडमिंटन कोच यांच्यावर मानसीक छळाचे आरोप केले आहेत. त्यांनी यात यौन शेषणाचे आरोप केलेले नाहीत. तिच्या अधिकृत ट्विटर खात्यावरील ट्विटमध्ये तिने तिचे म्हणणे समोर ठेवले. आपल्या आरोपात कुठेही तिने व्यक्तीचे नाव घेतले नाही.

आपल्या ट्विटच्या साखळीततिने लिहले आहे की, मला झालेल्या मनस्तापाबद्दल सांगायचे आहे.  २००६मध्ये भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा प्रमुख झाल्यापासून हा  व्यक्ती मला डालवत आहे. राष्ट्रीय विजेती असूनदेखील त्याने मला राष्ट्रीय संघाच्या बाहेर केले होते. सर्वात जवळची घटना सांगायची झाली तर रिओ ऑलम्पिकनंतर त्याने मला लगेच राष्ट्रीय संघाबाहेर केले.

-Ads-

‘ रिओ ऑलम्पिकच्यावेळी देखील त्याने माझ्या सहकारी खेळाडूंवर देखील दबाव टाकण्याचा प्रयन्त केला होता.  सतत डालवण्यात येत असल्याने मी खेळणे सोडून दिले. ‘

अर्जुन पुरस्कार विजेती खेळाडू ज्वाला गुट्टा हिचे  मागील काही वर्षांपासून गोपीचंद यांच्याशी मतभेद राहिले आहेत. ज्वाला गुट्टाने २०१६मध्ये झालेल्या आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)