एक वर्षानंतर दर पाच मिनिटांना बस

वर्षभरात पीएमपीच्या ताफ्यात नवीन 990 बसेस होणार दाखल – संचालक मंडळाची माहिती

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडाळाच्या ताफ्यात पुढील वर्षभरात सीएनजी आणि इलेक्‍ट्रिक मिळून टप्पाटप्याने 990 बसेस दाखल होणार आहेत. यातील 150 इलेक्‍ट्रिक आणि 400 सीएनजी मिळून एकूण साडेपाचशे बसेस जुलै-2019 पर्यंत तर, उर्वरीत भाडेतत्त्वावरील 440 बसेस सप्टेंबर-2019 पर्यंत दाखल होतील. यामुळे पुढील वर्षाअखेर पीएमपी ताफ्यातील बसेसची संख्या वाढणार असून शहरातील मुख्य रस्त्यांवर प्रत्येकी पाच मिनिटांना बस उपलब्ध होईल, अशी संचालक मंडळाकडून देण्यात आली.

पीएमपीच्या संचालक मंडळाची शनिवारी बैठक झाली. यावेळी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या. पीएमपीच्या ताफ्यात सध्या बसेसची संख्या कमी असल्याने संचलन करणे अवघड जात आहे. या पार्श्‍वभूमीवर बसेस खरेदीसाठी प्रक्रिया राबविण्यात आली असून लवकरात लवकर बसेस येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरवातीच्या टप्प्यात 26 जानेवारीपर्यंत 25 तर, एप्रिलमध्ये उर्वरीत 125 ई-बसेस ताफ्यात दाखल होतील.

त्याचबरोबर दोन्ही महापालिकेच्या मदतीने पीएमपीकडून 400 सीएनजी बसेस घेण्यात येणार असून जुलै-2019 अखेर टप्प्प्याटप्याने त्या ताफ्यात दाखल होतील. या बसेसाठी पुणे महापालिका 117 तर पिंपरी-चिंचवड महापालिका 78 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. यानंतर आणखी 440 सीएनजी बसेस या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. या बसेस सप्टेंबर किंवा ऑक्‍टोबर-2019 पर्यंत ताफ्यात दाखल होणार असल्याने एकूण 990 बसेस पुढील वर्षभरात दाखल होणार आहेत.

7 वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी
नव्याने ताफ्यात दाखल होणाऱ्या बसेसला आयटीएमएस यंत्रणा असून बस खरेदीनंतरची सात वर्षे त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची राहणार आहे. तसेच, दाखल होणाऱ्या बसेसच्या प्रमाणात ताफ्यातील आयुर्मान संपलेल्या बसेस कमी केल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)