कांदा अनुदान मागणीसाठी प्रस्ताव सादर करावेत

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांचे आवाहन

जुन्नर – कांद्याला बाजारात मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला असून, शेतकऱ्यांनी तातडीने विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी केले. जुन्नर, ओतूर किंवा आळेफाटा यापैकी ज्या बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी आपला कांदा विकला असेल त्याच ठिकाणी हा अनुदान अर्ज कागदपत्रांसह सादर करावा, असे काळे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1 नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 दरम्यान बाजार समितीत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 200 रुपये अनुदान शासनाने जाहीर केले आहे. कांदा विक्रीची पट्टी, सातबारा, बॅंक डिटेल्स व आधारकार्ड यांच्या छायांकित प्रति अर्जासोबत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सादर कराव्यात, असे आवाहन बाजार समितीचे सचिव चेतन रुकारी यांनी केले आहे.

घरातील ज्या व्यक्तीच्या नावावर कांद्याची नोंद असलेला 7-12 आहे, त्याच व्यक्तीच्या नावाने प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)