जम्मू काश्‍मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी अड्डा उद्‌ध्वस्त 

File photo...

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्‌ध्वस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. गोपनीय सूत्रांकडून मिळलेल्या खात्रीशीर माहितीनंतर जम्मू-काश्‍मीर पोलीस आणि अन्य सुरक्षा दलांनी मिळून ही कारवाई केली. कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा भागात काल रात्री केलेल्या या कारवाईत एका घरातून ग्रेनेड, जिवंत काडतुसांसह दारूगोळा आणि शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रवक्‍त्याने सांगितले. मोहम्मद अयूब राथार असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो यारीपोरा येथील निवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी मोहम्मदच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)