ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन 

नाशिक – ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे आज सकाळी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. मनमाड येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. स्वातंत्र्य सैनिक, खंडकरी शेतकऱ्यांचे नेते, झुंजार व लढवय्ये व्यक्तिमत्व अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती.

डाव्या चळवळीतील एक झुंजार नेते म्हणून गेली 5 ते 6 दशके कॉम्रेड माधवराव गायकवाड कार्यरत होते. माधवराव गायकवाड हे 1975 मध्ये ते जनेतूत थेट नगराध्यक्ष पदी निवडून आले होते. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. आदर्शवत व तत्वनिष्ठ राजकारणाने त्यांनी देशभर आपली वेगळी छाप उमटवली होती. खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळवून देण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. तर कामगार चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.

शेतकरी, कामगार, महिलांच्या प्रश्नासाठी त्यांनी शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठवला होता. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. मनमाड येथील राहत्या घरी आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी कुसुमताई, कन्या ऍड. साधना असा परिवार आहे.

माधवराव गायकवाड यांची शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताशी अखेरपर्यंत बांधिलकी होती. विशेषतः प्रदीर्घ काळ चाललेल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्यातील कम्युनिस्ट नेत्यांच्या पहिल्या पिढीतील ते एक प्रमुख नेते होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अखेरपर्यंत लढणारे एक लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)