न्यायाधिशानेच केला महिला वकिलाचा बलात्कार

हैद्राबाद: देशामध्ये बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाच बलात्काराचे आणखीन एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. सूर्यापेट जिल्ह्यातील एका कनिष्ठ दिवाणी न्यायाधीशाने वकिली करणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेचा लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे.
पीडित महिलेकडून बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली असून सत्यनारायण राव नामक कनिष्ठ दिवाणी न्यायाधीशाने आपल्याला लग्न करण्याचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले परंतु नंतर मात्र त्याने दुसऱ्याच महिलेशी साखरपुडा करत आपली फसवणूक केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी सत्यनारायण राव यास बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)