पत्रकार बुखारी हत्याकांडातल्या दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर: काश्‍मीरातील पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या करणारा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी नावीद झट्ट याचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. जम्मू काश्‍मीरच्या बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तो मारला गेला आहे अशी माहिती सुरक्षा दलांच्यावतीने देण्यात आली आहे.

पत्रकार शुजात बुखारी याच्या हत्या प्रकरणात पोलिस त्याचा बरेच दिवस शोध घेत होते. त्याचा खात्मा झाल्यानंतर त्याची प्रतिक्रीया उमटू नये म्हणून काश्‍मीर खोऱ्यातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बडगाम जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली आहे.पत्रकार बुखारी हे रायझींग काश्‍मीर या दैनिकाचे संपादक होते त्यांची श्रीनगर मध्ये त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच गेल्या जून महिन्यात हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून नावीद फरारी होता.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)