जोशीविहीरनजीक दोन ट्रकचा भीषण अपघात

भुईंज – पुणे-सातारा महामार्गावरील अनवडी गावच्या हद्दीतील टाकुबाईच्या माळावरील तीव्र उताराच्या एक नंबर लेनवर दोन मालट्रकच्या झालेल्या अपघातात चालक आणि क्‍लिनर गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एचआर 38 एस 2737 हा लोखंडी पाटे भरलेला मालट्रक पुण्याहून साताराकडे जात असताना तो अनवडी, ता. वाई गावच्या हद्दीतील टाकुबाईच्या माळावरील तीव्र उताराच्या एक नंबर लेनवर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आला असता पिठीमागून एमएच 4 सी 8828 भरघाव वेगात आलेल्या मालट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यातील चालक समाधान भीमराव सातपुते राहणार सातपुते वस्ती खरसुंडी, ता. आडपाडी आणि क्‍लिनर रफिक हळवेरी हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना भुईंज पोलीस ठाण्याचे हवालदार प्रवीण ढमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन केबिनबाहेर काढून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवलदार प्रवीण ढमाळ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)