कोहलीला बाद करण्यासाठी पर्याय आवश्‍यक – हेझलवूड

सिडनी – भारतीय संघाची फलंदाजी ही सध्या जगातील सर्वात बलाढ्य फलंदाजी समजली जाते. त्यात संघाचा कर्णधार विराट कोहलीहा सध्या फॉर्मात असल्यामुळे त्याला रोखणे अवघड असून त्याला बाद करण्यासाठी आम्हाला काही पर्यांची आवश्‍यकता असल्याचे विधान ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने केले आहे.

यावेळी बोलताना जोश पुढे म्हणाला की, मागिल दौऱ्यात कोहलीने चार शतकांसह 692 धावांचा रतिब ओढला होता. त्यामुळे तो यंदाही अश्‍याच प्रकारची फलंदाजी करु शकतो अशी शक्‍यता आहे. कारण नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि वेस्ट इंडीजदौऱ्यात त्याने आपल्यातील चमक दाखवून दिली. होती.

-Ads-

तसेच भारतीय फलंदाजी जरी बळकत असली तरी विराटला जर तुम्ही बाद करु शकला तर तुम्ही भारतीय संघाला मानसिकरित्या दडपणात आणु शकता त्यामुळे तुम्हाला त्याला बाद करणे सर्वात महत्वाचे आहे असेही तो यावेळी म्हणाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)