“पायरेटस ऑफ द कॅरेबियन’मधून जॉनी डेप बाहेर 

हॉलिवूडमध्ये गाजलेल्या “पायरेटस ऑफ द कॅरेबियन’च्या फ्रॅंचाइजीमध्ये जॅक स्पॅरोच्या रोलमध्ये गाजलेला जॉनी डेप आता य रोलमध्ये दिसणार नाही. गेल्या 15 वर्षांपासून “पायरेटस…’च्या सगळ्या सिनेमांमध्ये जॅक स्पॅरो ही व्यक्तिरेखा जॉनी डेप साकारत होता. एक दोनदा नव्हे तर पाच वेळा जॉनी डेपने जॅक स्पॅरोचा रोल साकारला होता आणि त्याने या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियताही मिळवून दिली होती.

त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमधील ही सर्वोत्तम व्यक्तिरेखा होती. “पायरेटस…’मधून बाहेर पडल्यावर जॉनी काय करेल याची काहीच चिंता नसावी. कारण आता तो हॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांपैकी एक गणला जातो. “पायरेटस…’ची निर्मिती करणाऱ्या डिस्नी स्टुडिओचीच यापूर्वीची निर्मिती असलेल्या “डेड मेन टेल नो टेल्स’ला बॉक्‍स ऑफिसवर विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे जॉनी डेपनी आता या सिरीजमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“पायरेटस…’चा पहिला सिनेमा 2003 मध्ये आला होता. या सिनेमाचे आतापर्यंत 4 सिक्‍वेल येऊन गेले आहेत. यापुढचा सिनेमा कधी येणार याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतेही सूतोवाच करण्यात आलेले नाही. त्यामध्ये कदाचित जॅक स्पॅरोसारखे नवीन पात्र असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)