जॉन बेली यांनी उलगडला 50 वर्षांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकीर्दीचा प्रवास

मुंबई: ‘द इंटरप्ले ऑफ सिनेमॅटोग्राफी अँड फिल्म एडिटिंग’  या विषयावर आयोजित संवादसत्रात आज ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांनी त्यांच्या 50 वर्षांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकीर्दीचा प्रवास उलगडला. आयनॉक्स, नरिमन पॉइंट येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऑस्कर अकादमीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांनी जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी आणि ऑस्कर अकादमीच्या गर्व्हनर कॅरल लिटलटन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

चित्रपट निर्मिती क्षेत्रात जॉन बेली यांनी सेल्युलॉईड ते डिजिटल युगापर्यंत अनुभवलेले बदल यावेळी अधोरेखित केले. श्री. बेली यांनी स्लिवराडो, इन द लाईन ऑफ फायर, चायना मून, द ॲक्सिडेंटल टुरिस्ट या चार चित्रपटातील त्यांनी चित्रित केलेल्या चित्रफितींच्या आधारे छायाचित्रणातील बारकावे सांगितले.

ऑस्कर अकादमीच्या गर्व्हनर कॅरल लिटलटन यांनी चित्रपट संकलन क्षेत्रातील अनुभव सांगितले. तसेच त्यांचे पती जॉन बेली यांच्यासोबतचा चार दशकांचा प्रवास उलगडला.

यावेळी सिनेमॅटोग्राफी आणि चित्रपट संकलन या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण चित्रपटकर्मींच्या प्रश्नांनाही बेली दाम्पत्याने सविस्तर उत्तरे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)