गॅंगस्टर असणारे चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले संजय गुप्ता आता “गॅंगस्टर’ थीमवर आधारित नवा सिनेमा काढणार असुन या चित्रपटात इम्रान हाश्मी आणि जॉन अब्राहम हे बॉलिवूडचे दोन सुप्रसिद्ध कलाकार एकत्र येणार आहेत. हा चित्रपट 1980 ते 1990च्या काळावर आधारित असुन या चित्रपटात दोन्ही कलाकार मुख्य भुमिकेत असणार आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच जॉन अब्राहम आणि इम्रान खान एकत्र येणार आहेत.
या चित्रपटा संदर्भात बोलताना संजय गुप्ता म्हणाले की, जॉन अब्राहमसोबत माझा हा तिसरा चित्रपट असून इम्रानसोबत मी पहिल्यांदाच काम करर्तोय. त्यामुळे त्याच्या सोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. त्याच्याबरोबर काम करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. पुन्हा एकदा “गॅंगस्टर’ नाट्य असलेला चित्रपट करताना घरी परत आल्यासारखे वाटते आहे. असेही त्याने यावेळी नमूद केले.
जुलैमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार असून वर्षाच्या अखेरीस शूटिंग पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. सध्या जॉन अब्राहम “पागलपंती’च्या शूटिंगमध्ये तर इम्रान अमिताभ बच्चन यांच्या “चेहरे’ च्या शुटींग मध्ये बिझी आहे.