जॉन अब्राहमच्या “पागलपंती’ची रिलीज डेट बदलली

जॉन अब्राहम आता “रोमिओ अकबर वॉल्टर’ (रॉ) या सिनेमात एका गुप्तहेराचा रोल करतो आहे. त्याच्या या सिनेमानंतर तो “पागलपंती’हा सिनेमा करणार आहे. त्याच्यामध्ये जॉनबरोबर एलियाना डिक्रूजही असणार आहे. हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज करायचे असे आगोदर ठरले होते. त्यामुळे अर्जुन कपूरचा “पानिपत’ आणि “पागलपंती’ बॉक्‍स ऑफिसवर एकाचवेळी आमने सामने येण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. हे टाळण्याठी “पागलपंती’च्या रिलीज डेटमध्ये बदल झाला आहे.

आता हा सिनेमा याच वर्षी 22 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. जॉन अब्राहम आणि एलियाना डिक्रूजबरोबर अनिल कपूरदेखील यामध्ये लीड रोलमध्ये असणार आहे. याशिवाय अर्शद वारसी, पुलकित सम्राट, कृती खरबंदा, उर्वशी रौतेला आणि सौरभ शुक्‍ला हे कलाकारही त्यामध्ये असणार आहेत. नियोजित तारखेपूर्वीच सिनेमा रिलीज केल्याचा फायदा जॉनच्या सिनेमाला मिळणार आहे. “पागलपंती’चे शुटिंग सध्या लंडनमध्ये सुरू आहे. टी सिरीजचे प्रॉडक्‍शन असलेल्या “पागलपंती’ची कथा टिपिकल बॉलिवूड कॉमेडी मसाला फेम असणार आहे, असे समजते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)