जोधपूर : भारतीय वायूदलाचे ‘मिग 27’ लढाऊ विमान कोसळले

नवी दिल्ली – राजस्थानमधील जोधपूर येथील देवरिया गावात मंगळवारी सकाळी भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानाला मोठा अपघात झाला आहे. आधी विमानाला आग लागली, त्यानंतर विमान अनियंत्रित होऊन देवरिया गावाजवळ हे विमान कोसळले.

विमान आगीत जळून खाक झाले असून सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानात असलेले दोन्ही पायलेट हे सुरक्षित आहेत. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याच काम सुरू आहे.

विमान अपघातानंतर वायूदलाने अपघाताचा तपास करण्यासंबंधीचे आदेश दिले आहेत  त्यानंतर. विमानाला नेमकी आग कशी लागली याचा तपास आता पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)