आगामी काळात बॅंकांतील नोकरभरती वाढण्याची शक्‍यता

प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली – हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांमुळे आता मोठी नोकरभरती होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यानी रोजगार वाढवण्यासाठी आणखी आठ बॅंकांना पीसीएतून बाहेर काढण्याचे सूतोवाच केले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे या बॅंका स्वतःच्या शाखा वाढवू शकणार आहेत. बॅंकांनी शाखा वाढवल्यास नोकरभरती करण्यात येणार असून, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

गोयल म्हणाले, आरबीआयनं बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सला पीसीए (प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ऍक्‍शन)मधून बाहेर ठेवले आहे. आता आणखी काही बॅंकांना आम्ही पीसीएतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. पीएसीएमध्ये सहभागी असलेल्या बॅंकांची परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत या बॅंका मोठे कर्ज देऊ शकत नाहीत. या बॅंकांना पीसीएतून बाहेर काढल्याने ग्राहकांवर कोणताही सरळ परिणाम होणार नाही. परंतु या बॅंकांना स्वतःच्या शाखा वाढवण्यास मदत मिळणार आहे.

या बॅंका नव्या शाखेतील कर्मचाऱ्यांसाठी नव्याने भरती करतील. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कोणत्याही बॅंकेला पीसीएमध्ये ठेवल्यास त्याची ग्राहकांना चिंता करण्याची आवश्‍यकता नसते. कारण आरबीआयने काही मानकांच्या आधारावर बॅंकांच्या वित्तीच्या स्थितीत सुधार होण्यासाठी पीसीए हा फ्रेमवर्क तयार केला आहे. जेणेकरून बॅंक आपल्या निधीचा योग्य वापर करून संभाव्य धोक्‍यातून बाहेर पडू शकेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)