नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (जेएनयूएसयू) निवडणूकीनंतर शनिवारी हिंसा आणि तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मतमोजणी स्थगित करण्यात आली होती. मात्र आज रविवारी पुन्हा मतमोजणीस सुरूवात झाली आहे.

आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये अध्यक्ष पदासाठी यूनाइटेड लेफ्ट सर्वांत आघाडीवर आहे. दुसऱ्या नंबरवर एबीव्हीपी आहे. उपाध्यपदाच्या पदाच्या लढतीमध्ये सुध्दा यूनाइटेड लेफ्ट उमेदवार आघाडीवर आहे. तर एबीव्हीपी दुसऱ्या स्थानासाठी संघर्ष करत असल्याचे दिसत आहे. महासचिव आणि संयुक्त सचिव पदासाठी सुध्दा यूनाइटेड लेफ्टचा उमेदवार आघाडीवर आहे. आजच विद्यार्थी संघाचे निकाल घोषित होतील अश शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान काल शनिवारी काहीजणाकडून मतमोजणी केंद्रात जबरदस्तीने प्रवेश केल्याने आणि मतपेट्या जबरदस्ती उचलून नेण्याच्या प्रयत्नानंतर मतमोजणी स्थगित करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)