जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरु ; पत्नीला कैद केल्याचा कुलगुरुंचा आरोप

विद्यार्थ्यांनी पत्नीला घरात कैद केल्याचा कुलगुरूंचा आरोप

दिल्ली –
 जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सोमवारी रात्री विद्यार्थ्यांनी कुलगुरु एम.जगदीश कुमार यांच्या घराला घेराव घातला. विद्यार्थ्यांनी घराची देखील तोडफोड केली आणि पत्नीला घरात कैद केल्याचा आरोप कुलगुरु जगदीश कुमार यांनी केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील विद्यार्थ्यांनी कुलगुरु जगदीश कुमार यांच्या घरापर्यंत सोमवारी रात्री मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांनी कुमार यांच्या घरावर मोर्चा काढला. पण मोर्चाता सहभागी झालेले काही विद्यार्थ्यांनी कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. यावेळी सुरक्षा रक्षक आणि विद्यार्थी यांच्यात वाद देखील झाला. कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी ट्विटरवरून सांगितले की, जेव्हा हिंसक झालेल्या विद्यार्थ्यांनी माझ्या निवासस्थानावर हल्ला केला त्यावेळी मी विद्यापीठाच्या बैठकीत होतो. त्यानंतर जेव्हा मी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराकडे परतलो तेव्हा ४०० ते ५०० विद्यार्थ्यांचा जमाव माझ्या घराभोवती होता. हे विद्यार्थी सुरक्षारक्षांना धक्काबुक्की करीत होते, तसेच त्यांनी कुंपणाचे दार तोडले आणि घराच्या परिसरात प्रवेश केला.

यादरम्यान, माझी पत्नी एकटीच घरात होती. त्यामुळे घराभोवती घोषणाबाजी करणाऱ्या ४००-५०० विद्यार्थ्यांच्या जमावाने घेराव घातलेला असताना त्या एकट्या महिलेची काय अवस्था झाली असेल याचा तु्म्हाल अंदाज आला असेल. माझ्या पत्नीला तब्बल तीन तास घरामध्ये कैद ठेवण्यात आले, असे कुलगुरु जगदेशकुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)