नवी दिल्ली:  जवाहरलाल नेहरू विद्यापीठा(जेएनयू)च्या व्यवस्थापक मंडळाने तेथील ४८ प्राध्यापकांना ३१ जुलै रोजी झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्याबाबत कारणे द्या नोटीस बजावली आहे. त्यांनी जेएनयूचे उप कुलगुरु यांच्या नवीन कायद्यांचा विरोध म्हणून एक दिवसीय आंदोलनात सहभाग नोंदवला होता. हा निर्णय आज कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आला.

जेएनयूमधील प्राध्यापिका आयेशा किडवाई यांनी सांगितले की, “नोटीसमध्ये असे लिहले आहे की, हे जे आंदोलन होते ते विद्यापीठाच्या मर्यादेच्या विरुद्ध, विद्यापीठाच्या नियम आणि अटींच्या विरोधात आहे. आम्ही खूप विचलित झालो आहोत. कारण,  शांततेच्या मार्गाने विरोध करण्याचा लोकशाहीत असणारा हक्क हे विद्यापीठ कायदा आणि वैधतेच्या दृष्टीने पाहत आहे.”
दरम्यान, उप कुलगुरूंच्या नवीन नियमाच्या विरोधात ३१ जुलै रोजी तेथील प्राध्यापकांनी फलके आणि काळ्या फिती लावून विरोध नोंदवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)