जम्मू-काश्‍मीर हा भारताचाच भाग : राजनाथ सिंह 

लखनौ: जम्मू-काश्‍मीर हा भारताचा भाग असून तो भारताचाच राहिल. कोणतीही शक्ती त्याला आमच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पाकिस्तानला ठणकावून सांगितले.
लखनौ येथे सीआरपीएफच्या रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या 26व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राजनाथ म्हणाले, काश्‍मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. तो आमचा होता आणि कायम आमचाच राहणार आहे. जगातली कोणतीच शक्ती त्याला आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही.
दंगल, कायदा आणि सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न त्याचबरोबर मदत आणि बचाव कार्यांमध्ये रॅपिड ऍक्‍शन फोर्स अग्रेसर असते. यावेळी राजनाथ यांनी सीआरपीएफच्या कार्याचे कौतुक केले. काश्‍मीरी लोक आणि दहशतवाद्यांशी योग्य प्रकारे हाताळणी करुन नियंत्रण मिळवण्याचे कार्य सीआरपीएफने केल्याचे यावेळी राजनाथ म्हणाले.
जर काही काश्‍मीरी तरुणांनी काही लोकांच्या बहकाव्यात येऊन नको असलेल्या गोष्टी केल्या असतील तर त्यांना तुम्ही आपल्या देशाचे नागरिक या नात्याने योग्य प्रकारे हाताळता. पण जर एखादी व्यक्ती दहशतवादी कारवायांमध्ये अडकली असेल तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला त्यांचा खात्मा करण्यापासून थांबवू शकत नाही, असेही यावेळी राजनाथ म्हणाले.
जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवायांना आपले सुरक्षा रक्षक सडेतोड उत्तर देत असल्याने सध्या तेथे दहशतवादी कारवाया कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)