‘सत्तर सालो में बदल गया देस, पंतप्रधान भी कहने लगे चौकीदार का देस’

मुंबई: रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर टीकेची भडीमार सुरु केला आहे. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी जाऊन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, गर्जे यांनी रंगपंचमी साजरी केली. दरम्यान, आव्हाड यांनी मोदींवर टीका केली.

”सत्तर सालो में बदल गया मेरा देस, पंतप्रधान भी कहने लगा चौकीदार चौकीदार का देस,” अशी टीका आव्हाड यांनी केली. यापूर्वी होळीच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून धनंजय मुंडे यांनी एक ट्विट केले असून याद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे यांनी सलमान खान आणि रविना टंडन यांच्या पत्थर के फूल या चित्रपटातील “कभी तू दीवाना लगता है कभी अनाडी लगता है…” या गाण्याची चाल वापरत मोदींवर निशाणा साधला आहे. ते लिहितात, “कभी तू फकीर लगता है कभी आवारा लगता है कभी तू चायवाला लगता है कभी चोर चौकीदार लगता है…
हमेशा अपना रंग बदलने वालोंको भी होली की शुभकामनाएं! बुरा ना मानो होली है…

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)