मनोहर पर्रिकर माफ करा त्यांना; जितेंद्र आव्हाडांची भाजपवर खोचक टीका

मुंबई – सत्तेसाठी वाटेल ते हीच भाजपाची ओळख आहे, मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर दुखवटा संपण्याचाआधीच भाजपाने गोव्यात नवीन मुख्यमंत्र्यांचा शप्पथविधी केला, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर केली आहे.

दरम्यान, काल गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असणाऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असणाऱ्या मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना जोरदार वेग आला होता. मध्यरात्री १ वाजून ४५ मिनिटांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी ‘प्रमोद सावंत’ यांच्या हातात गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटव्दारे भाजपावर टीका करताना म्हटले आहे की,

काय हो
केलात ना शपथविधी
थांबला नाहीत ना दुखवटा संपे पर्येंत
कुठे गेली तुमची संस्कृती आणि संस्कार
घरातला करता पुरुष गेला तर आम्ही हिंदू घरातली शुभ कार्य पुढे ढकलतो
एवढे भान तर ठेवायला हवे होते
पण सत्ते साठी वाट्टेल ते हीच भाजपची ओळख आहे
#मनोहर_पार्रिकर माफ करा त्यांना

जितेंद्र आव्हाड यांनी काल मनोहर पर्रिकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होत. त्यानंतर सोशल माध्यमांवर भाजप विरूध्द जितेंद्र आव्हाड ( राष्ट्रवादी ) असं आरोप-प्रत्यारोपांच सोशल युध्द सुरू झालं असून दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नसल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)