पुणे : नातू-पणतू पळवणाऱ्यांना लखलाभ, पळवा रे पळवा..! असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलं आहे. तसंही पळत आहेत ती श्रीमंताची पोरं आहेत, ही पोरं पळाली तर गरिबांच्या पोरांना संधी मिळेल, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपवर मुलं पळवणारी टोळी असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आल्यानंतर आता मुलंच नाही तर नातवंडही पळवू, असा इशारा गिरीश महाजनांनी दिला होता.
त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गिरीश महाजन यांना याबाबत ट्विट करत म्हटलं आहे की, “शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवणार्यांचे अनेक नातू-पणतू वैचारीक आग ओकताहेत. 70 वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीत गांधींचे विचार मांडणारे आजोबा,पणजोबा, यांच्या कार्यकर्तृत्वावरती आयता ताव मारणारे तुप-लोणी खाऊन मदमस्त झालेले नातू-पणतू पालवणार्याना लखलाभ. पळवा रे पळवा!!
शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवणार्यांचे अनेक नातू-पणतू वैचारीक आग ओकताहेत.
70 वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीत गांधींचे विचार मांडणारे आजोबा,पणजोबा, यांच्या कार्यकर्तृत्वावरती आयता ताव मारणारे तुप-लोणी खाऊन मदमस्त झालेले नातू-पणतू पालवणार्याना लखलाभ
पळवा रे पळवा!!— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 14, 2019