नथुरामाच्या वारसांनी आम्हांला शिकवण्याची गरज नाही – जितेंद्र आव्हाड

मुंबई – कसाबला आणि अफझल गुरुला फाशी मनमोहन सिंग सरकारने दिली. मात्र मनमोहन सिंग सरकारनेच पकडलेल्या मसूद अझहरला सोडण्याच काम भाजप सरकारने केले. त्याच मसूद अझहर ने पुलवामा घडवले. या पापाची जबाबदारी घेणार का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला केला आहे.

तसेच नथुरामाच्या वारसांनी आम्हांला शिकवण्याची गरज नाही, असाही सल्ला आव्हाड यांनी थेट भाजपाला दिला आहे.

दरम्यान, मतांच्या राजकारणासाठी जे दहशतवाद्यांना मदतीचा हात देतात त्यांना माणुसकी म्हणजे काय हे माहिती तरी असते का ? अशी टीका भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसवर केली होती. त्यांनतर या टीकेला प्रत्युत्तर देताना आव्हाड यांनी भाजपावर निशाना साधला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)