जितेंद्र आणि जयाप्रदा 24 वर्षांनी एकत्र

जितेंद्र आणि जयाप्रदा यांनी 18 हिट सिनेमे दिले आहेत, तर 24 सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. या जोडीमध्ये जबरदस्त बॉंडिंग आणि परफेक्‍ट ऑनस्क्रीन केमिस्ट्री बघायला मिळत असे. हे दोघेही 1979 साली “लोक परलोक’मध्ये सर्वप्रथम आणि 1995 मध्ये सर्वात शेवटी “पापी देवता’मध्ये एकत्र दिसले होते.

याशिवाय टक्कर, मवाली, तोहफा, संयोग, हैसियत, स्वर्गसे सुंदर, सौतन की बेटी यासारख्या यादगार सिनेमांमध्ये यांची जोडी खूप गाजली होती. तब्बल 24 वर्षांनंतर हे दोघे एका डान्स रिऍलिटी शो च्या निमित्ताने एकत्र आले होते. या वर्षी एप्रिलमध्ये जयाप्रदा 60 वर्षाच्या होतील. त्या सध्या राजकारणातही खूप सक्रिय आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जितेंद्र राजकारणापासून दूर असले तरी चित्रपट आणि सिरीयल निर्मितीच्या क्षेत्रात सक्रिय असलेली कन्या एकता कपूरला मार्गदर्शन करण्यात ते अग्रेसर आहेत. 24 वर्षांनंतर एकत्र आलेल्या जयाप्रदा आणि जितेंद्र यांच्यातील बॉंडिंग पुन्हा एकदा दिसले. या दोघांनी खूप हास्यविनोद केले. त्यांच्यातील निखळ मैत्री या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)