‘जिजा-साले’ दोघे भ्रष्टाचारी : स्मृती इरानींचे राहुल गांधींवर गंभीर आरोप

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. एकीकडॆ कॉंग्रेस भाजपावर भ्रष्टाचार करण्याचा आरोप करीत आहे, तर दुसरीकडे, भाजप कॉंग्रेसने केलेले घोटाळे उघड करण्याचा दावा करत आहे. अशातच आज केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आरोप केले आहेत. एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, “70 वर्षांचा आपल्या राजवटीमध्ये काँग्रेसने देशाला संस्थागत भ्रष्टाचाराची देणगी दिली आहे. मात्र गेल्या 24 तासांमध्ये प्रसारमाध्यमांमधून आलेल्या बातम्यांमधून असे स्पष्ट होते की गांधी-वढेरा कुटुंब हे देशातील कौटुंबिक भ्रष्टाचाराची व्याख्याच बनले आहेत.”

याबाबत अधिक माहिती देताना स्मृती इराणी म्हंटल्या की, “राहुल गांधी हे रॉबर्ट वढेरा यांच्यामागे लपण्याच्या प्रयत्न करीत आहेत. वास्तवात रॉबर्ट वढेरांच्या नावावर असलेले घोटाळे हे राहुल गांधी यांनीच केले असून त्यांनी देशातील जनतेला सांगावे की त्यांना संरक्षण करारामध्ये एवढे स्वारस्य का आहे? देशाच्या संरक्षणाचे बलिदान राहुल गांधींनी कशासाठी दिले? काही रुपयांसाठी? जमिनींनसाठी? की आणखीन कशासाठी?”

स्मृती ईरानी यांनी सांगितले की, “एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, एचएल पहवा नावाच्या व्यक्तीकडे राहुल गांधी यांच्याशी संबंधित व्यवहाराचे कागदपत्र मिळाले. त्यांनी सांगितले की जमीन खरेदीशी संबंधित या कागदपत्रांवरून दिसून येते की राहुल गांधी यांचे एचएल पहवाबरोबरचे आर्थिक संबंध आहेत. त्यांनी सांगितले की एचएल पहवाच्या घरात धड टाकल्यानंतर निदर्शनास आले की जमीन विकत घेण्यासाठी पहवाकडे पैसे नव्हते. राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांच्यासाठी भूखंड खरेदी करण्यासाठी सी सी थंपीने 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले होते.”

स्मृति ईरानी यांच्या मते, “युपीए सरकारमध्ये संरक्षण संबंधित करार आणि इंधना संबंधित करारामध्ये जो गैरव्यवहार झाला होता त्यामध्ये संजय भंडारी आणि सी सी थंपी यांची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहेत. भंडारी आणि रॉबर्ट वढेरा यांच्यातील संबंध या आधीच अधोरेखित झाले असून आता यात राहुल गांधी यांचे देखील नाव आल्याने केवळ रॉबर्ट वाढेराच नव्हे तर राहुल गांधी देखील घोटाळेबाजच आहेत.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)