भाजप सरकारला कशाला प्राधान्य द्यायचे तेच समजले नाही : जिग्नेश मेवानी

पालघर: केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप सरकारला प्राधान्य कशाला दिले पाहिजे हेच शेवटपर्यंत समजले नाही, असा आरोप गुजरातमधील युवानेते आमदार जिग्नेश मेवानी यांनी केला आहे. पालघर जिल्ह्यातील वसई येथे पर्यावरण संवर्धन समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावरही सडकून टीका केली. मोदी हे नटसम्राट आहेत, त्यांनी केवळ विकासाचे पोकळ दावे केले आहेत.

लोकांच्या पदरात त्यांच्यामुळे काहीच पडले नाही, असा आरोपही त्यांनी केला. बुलेट ट्रेनच्या नादी न लागता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकल वाहतूक सुधारण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या बुलेट ट्रेनचे भाडेच लोकांना परवडणार नाही त्या प्रकल्पाची गरजच काय, असा सवाल त्यांनी यावेळी केला. राममंदिराचा उल्लेख करून ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा लोकसभेच्या निवडणुका जवळ येतात त्या प्रत्येक वेळी हा विषय उपस्थित केला जातो. त्यामुळे याविषयी आता लोकांनीच सावध राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विकास प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या अमूल्य जमिनी कवडीमोल भावाने घेऊन त्यांना सध्या देशोधडीला लावले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुजरातेत इतका प्रचंड खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याची गरज आहे काय, असा सवालही त्यांनी केला. वसई-विरार पट्ट्यातील शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)