लालू प्रसाद यादवांच्या अडचणी कायम; कोर्टाने पुन्हा फेटाळला जामीन 

संग्रहित छायाचित्र

रांची : चारा घोटाळ्यामध्ये सध्या कारागृहामध्ये असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या अडचणींमध्ये आज आणखीन भर पडली आहे. चारा घोटाळ्यामध्ये आज झारखंड उच्च न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

याबाबत सीबीआयचे वकील राजीव सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अपरेश कुमार सिंग यांनी आज चारा घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना यादव यांचा जमीन अर्ज फेटाळून लावला.

यादव सध्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (आरआयएमएस) च्या पेडिंग वॉर्डमध्ये दाखल आहेत.

१९९० च्या दशकामध्ये लालू प्रसाद यादव हे फाळणीपूर्वीच्या बिहारचे मुख्यमंत्री असताना सरकारी तिजोरीतील निधी अवैधरित्या वापरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)