जेऊर सोसायटीतील 1 कोटीच्या गैरव्यवहारात 28 जणांवर गुन्हा

लेखा परिक्षकाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांची कारवाई

नगर – जेऊर (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सोसायटीत 1 कोटी 18 लाख 54 हजारांचा गैरव्यवहार झाला असून, सचिवांसह आजी-माजी संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखा परिक्षक प्रकाश गडाख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

-Ads-

अजय बाळासाहेब पटारे, मारूती सीताराम तोडमल, सुभद्रा पोपट म्हस्के, रंगनाथ शंकर बनकर, रामचंद्र चिमाजी धनवडे, दत्तात्रय शंकर मगर, विश्‍वनाथ मल्हारी शिंदे, साहेबराव अनिलराव वाघ, भरत अनुश्री तोडमल, लक्ष्मण गजाराम तोडमल, दिलीप एकनाथ ससे, ताराबाई हिंदेराव मगर, विजय आनंदा पाटोळे, शिवाजी संतू तवले, मच्छिंद्र एकनाथ ससे, बाबासाहेब निवृत्ती शिंदे, अनिल ज्ञानदेव तोडमल, पांडुरंग सोपान नवले, अंबादास माधव म्हस्के, ज्ञानदेव तुकाराम गोरे, बालाजी मनोहर पाटोळे, सुनीता पोपट घुगरकर, अरुण भानुदास तोडमल, चिमाजी पांडुरंग धनवडे, एन. एल. धनवळे, एस. सी. पाटोळे, टी. जे. सिनारे, आर. जे. मानतोडे यांच्यासह 28 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जेऊर सोसायटीच्या कर्जदार सभासदांचे कर्जाच्या हप्तेपोटी भरण्याची रक्कम परस्पर लांबवली. 1 कोटी 18 लाख 54 हजार 145 रुपये एवढी मोठी ही रक्कम आहे. ही रक्कम सचिवांनी बॅंकेत भरली नाही. लेखा परिक्षणात ही बाब उघडकीस आली. त्यावरून लेखा परिक्षक प्रकाश गडाख यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

जेऊर सोसायटीतील हा गैरव्यवहार वर्षभरापासून गाजत होता. उपनिबंधकांकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार चौकशीही झाली. उपनिबंधक यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. लेखा परिक्षकांनी त्यानुसार एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली. एमआयडीसी पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेत तो आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी या माहितीला दुजोरा दिला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)