‘जेट’ व्यवहाराच्या हालचाली

टाटा सन्सच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून टाटा सन्स आणि जेट एअरवेजदरम्यान बोलणी चालू असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही कंपन्यांनी यावर अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र आता ही बोलणी बरीच पुढे गेली असल्याचे बोलले जात असून टाटा सन्सच्या संचालक मंडळाची या विषयावर शुक्रवारी बैठक होण्याची शक्‍यता आहे. यामुळे जेट एअरवेजच्या शेअरच्या भावात आज मोठी वाढ झाली. या कंपनीचा शेअर काही दिवसापासून वाढत आहे.

जेट एअरवेजसमोर मोठा आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे ही कंपनी भांडवल उभारणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करीत आहे. त्याबाबात अनेक शक्‍यतेचा विचार केला जात आहे. टाटा समूहाशीही काही शक्‍यतावर चर्चा चालू असल्याचे बोलले जात आहे. आता जेट एअरवेजमधील काही भागभांडवल विकत घेण्याच्या शक्‍यतेवर टाटा समूहात चर्चा चालू असून त्यावर संचालक मंडळ चर्चा करण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे.

या दोन्ही कंपन्याच्या प्रवक्‍त्यांनी मात्र या विषयावर आताचा बोलण्यास नकार दिला आहे. मात्र ही चर्चा फलदायी होण्याची शक्‍यता असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे. टाटा समूह अगोदरच नागरी विमान वाहतूक क्षेत्रात चांगलाच सक्रिय आहे. या समूहाकडून देशात विस्तारा आणि एअर एशिया या कंपन्या चालविल्या जात आहेत. ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे याचा अनेक कंपन्याशी संबंध येत असल्यामुळे दोन्ही कंपन्यांचे प्रवक्‍ते याबाबत बोलण्यास तयार नाहीत असे दिसते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)