जेट एयरवेज कंपनीकडे केवळ दोन महिन्याचेच पैसे

नवी दिल्ली – जेट एअरवेज कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली असून कंपनीकडे केवळ दोन महिन्यांचेच पैसे उरले आहेत. जर खर्च कमी न झाल्यास दोन महिन्यांनंतर कंपनी चालविणे अशक्य होणार असल्याचे कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याचा अटीवर सांगितले आहे कि, खर्च कमी न झाल्यास कंपनी चालविणे अवघड होणार असल्याचे व्यवस्थापनाकडून आम्हाला सांगण्यात आले आहे. खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातही २५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आणखी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे कंपनीने म्हंटले आहे. याबद्दल ई-मेल पाठवून विचारले असता त्याचेही उत्तर आलेले नाही. एवढेच नव्हे तर आता कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळली आहे. याची सुरुवात इंजिनीअरिंग विभागापासून झाली आहे.

गोयल यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन मंडळाने गुरुवारी कर्मचाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्चा तेलाच्या किमती आणि बाजारापेठेतील मोठा हिस्स्यावर इंडिगोचे असणारे कंट्रोलमुळे कंपनीची स्थिती खराब झाल्याचे सांगितले आहे. शिवाय ते म्हणाले कि, मागील सहा वर्षात कंपनीचा विस्तार झाला नाही यामुळेही आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. दरम्यान, २०१६ आणि २०१७ च्या नफ्यात राहणारी जेट एयरवेजला २०१८ च्या आर्थिक वर्षात ७६७ कोटी रुपयांचा तोटा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)