जेनिफर लोपेझचा सहाव्यांदा साखरपुडा

अमेरिकेतील सिंगर आणि ऍक्‍ट्रेस जेनिफर लोपेझने सहाव्यांदा साखरपुडा केला आहे. यावेळी तिचा होणारा नवरा हा रिटायर्ड बेसबॉल खेळाडू ऍलेक्‍स रॉड्रिगेज आहे. त्याच्याबरोबर जेनिफरने दोन वर्षे डेटिंग केले होते. स्वतः जेनिफरने इन्स्टाग्रामवर आपल्या साखरपुड्याची माहिती दिली आहे. ऍलेक्‍स रॉड्रिगेजनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून जेनिफरचा फोटो शेअर करताना “ती हो म्हणाली’ असा सूचक मेसेज पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये जेनिफरच्या बोटामध्ये साखरपुड्याची अंगठी घातलेली स्पष्ट दिसते आहे.

जेनिफर लोपेझचा यापूर्वी 4 वेळा विवाह होऊन गेला आहे. तर 5 वेळा साखरपुडाही झाला आहे. आपल्या लव्ह लाईफ बाबत जेनिफर खूपच खुलेपणाने बोलत राहिली आहे. तिने कोणताच आडपडदा कधीच ठेवला नाही. हॉटेल व्यावसायिक ओजानी नोवा, डान्सर ख्रिस ज्युड, ऍक्‍टर बेन ऍफ्लेक्‍स आणि गायक मार्क अँथनीबरोबर तिचा विवाह झाला आहे. त्यांच्या प्रेमकथांचे विश्‍लेषण गॉसिप मॅगझीनमधून लोकप्रिय होईपर्यंत जेनिफरचे पुढचे अफेअर सुरू झालेले असायचे. मॅरेज स्टेटसबाबत तिची तुलना 8 वेळा विवाहबद्ध होणाऱ्या एलिझाबेथ टेलरबरोबर होऊ लागली आहे.

काहीही असो पण आता नव्या पार्टनरबरोबर मॅरेज लाईफ एन्जॉय करायला जेलो खूप उत्सुक आहे. बेवर्ली हिल्स हॉटेलमध्ये जेनिफर आणि ऍलेक्‍सची पहिल्यांदा भेट झाली, तेंव्हापासून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आमच्यामध्ये खूप गोष्टी कॉमन आहेत, म्हणूनच आमचे खूप चांगले पटते आहे, असे ऍलेक्‍सनेही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले. दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर यावर्षी 4 फेब्रुवारीला त्यांनी आपले रिलेशन जगजाहीर केले आणि आता काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)