#NZvSL Test : दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड 2 बाद 104

श्रीलंकेवर घेतली एकूण 305 धावांची आघाडी 

क्राइस्टचर्च – न्यूझीलंड वि. श्रीलंका याच्यांतील दोन कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड येथील क्राइस्टचर्च येथे सुरू आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 2 बाद 231 धावांपर्यत मजल मारली असून श्रीलंकेवर 305 धावांनी आघाडी घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 178 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव सर्वबाद 104 धावसंख्येवरच आटोपला. त्यामुळे न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात 74 धावांची आघाडी मिळाली होती.

दुसऱ्या डावात न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 231 धावा केल्या असून पहिल्या डावातील 74 धावांच्या आघाडीसह श्रीलंकेविरूध्द एकूण 305 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर जीत रावल 74  आणि  केन विलियमसन हा 48 धावांवर बाद झाले आहेत. श्रीलंकेकडून दिलरूवान परेरा आणि लाहिरू कुमारा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडचा फलंदाज टाॅम लाथम नाबाद 74 आणि राॅस टेलर नाबाद 25 धावांवर खेळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)